breaking-newsमनोरंजन

यूएसमध्ये माधवन-शाहरूखचे शुटिंग

बॉलीवूडचा “बादशाह’ अर्थात शाहरूख खान याचा आगामी चित्रपट “झिरो’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या टीजरमुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखीन वाढविली आहे. दरम्यान, ऍलबामा येथे शाहरूख खान आणि आर. आर. माधवन एका चित्रपटाचे शुटिंग करताना स्पॉट करण्यात आले.
ऍलबामा येथील दोघांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या फोटोत ते सेलिब्रेशनच्या मुडमध्ये असल्याचे दिसून येते. कोणीतरी केक कापत असून माधवन आणि शाहरूख त्याला चिअर करत आहते, असे वाटते.

“झिरो’ चित्रपटात शाहरूख एका विशेष व्यक्‍तीची भूमिका साकारत असून तो बॉलीवूड चित्रपटाचा चाहता आहे. चित्रपटात अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ या अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार आहेत. याशिवाय सलमान खान, राणी मुखर्जी, काजोल, करिश्‍मा कपूर आणि आलिया भट्ट आदी कलाकार स्पेशल अपियरेंस म्हणून काम करणार आहेत.
“झिरो’ चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले असून हिमाशू शर्मा यांनी कथानक लिहिले आहे. हा चित्रपट नाताळापूर्वी म्हणजे 21 डिसेंबर 2018 रोजी प्रदर्शित होण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात अनुष्का एका मानसिक रुग्ण असलेल्या मुलीची भूमिका साकारणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button