breaking-newsक्रिडा

युवान नांदल, कुंदना भंडारू यांना विजेतेपद

  • एमएसएलटीए-योनेक्‍स्‌ सनराईज्‌ इएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा

औरंगाबाद- मुलांच्या गटात हरियाणाच्या आठव्या मानांकित युवान नांदलने आयुष्मान अरजेरियाचा पराभव करत तर मुलींच्या गटात तामिळनाडूच्या कुंदना भंडारूने श्रुती अहलावतचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या एड्युरन्स्‌ मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर (इएमएमटीसी) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए – योनेक्‍स्‌ सनराईज्‌ इएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

इएमएमटीसी टेनिस कोर्ट, डिव्हिजनल स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्‍स्‌ येथे पार पडलेल्या या स्पर्धेत विजेतेपदाच्या लढतीत मुलांच्या गटात हरियाणाच्या आठव्या मानांकित युवान नांदलने आपली विजयी घोडदौड कायम राखत मध्यप्रदेशच्या दुसऱ्या मानांकित आयुष्मान अरजेरियाचा 7-5, 6-2 असा सरळ दोन सेटमध्ये एकतर्फी पराभव करताना स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. हा सामना तब्बल दोन तास चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये युवानने सुरेख सुरूवात करत पहिल्याच गेममध्ये आयुष्मानची सर्व्हिस भेदली. या सेटमध्ये युवानने वर्चस्व राखत तिसऱ्या, नवव्या व आकराव्या गेममध्ये आयुष्मानची सर्व्हिस रोखली व हा सेट 7-5 अशा फरकाने जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये युवानने आयुष्मानला कोणतीही संधी न देता पाचव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-2 अशा फरकाने सहज जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. युवान हा हरियाणा रोहतक राजीव गांधी स्टेडियम येथे निखिल हुडा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

तर, मुलींच्या गटात तामिळनाडूच्या चौदाव्या मानांकित कुंदना भंडारूने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पाचव्या मानांकित श्रृती अहलावतचा 6-2, 6-3 असा सरळ सेट मध्ये एकतर्फी पराभव करत विजेतेपद राखले. कुंदना ही तामिळनाडू टेनिस असोसिएशन येथे प्रशिक्षक श्रीनिवास राव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. 13 वर्षीय आलगाप्पा स्कूल येथे नवव्या इयत्तेत शिकते. तीचे हे पहिलेच राष्ट्रीय विजेतेपद आहे.

विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एड्युरन्स्‌चे सुरक्षा विभागाचे प्रमुख व सीएसआर संजय दत्ता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एआयटीए सुपरवायझर वैशाली शेकटकर, ईएमएमटीसीचे सेंट्रल हेड आशुतोष मिश्रा, डॉ.अश्विनी जैस्वाल, गजेंद्र भोसले, ईएमएमटीसीचे मुख्य प्रशिक्षक आर चंदन, प्रविण गायसमुद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

सविस्तर निकाल:
एकेरी गट अंतिम : फेरी: मुले – युवान नांदल (हरियाणा) (8) वि.वि. आयुष्मान अरजेरिया(मध्यप्रदेश)(2) 7-5, 6-2.
एकेरी गट अंतिम फेरी : मुली – कुंदना भंडारू (तामिळनाडू) (14) वि.वि. श्रृती अहलावत (5) 6-2, 6-3.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button