‘या’ ड्रेसवरून ट्रोल होतेय स्वरा भास्कर

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. आता स्वरा तिने परिधान केलेल्या ड्रेसवरून ट्रोल होत आहे. स्वराने परिधान केलेल्या ड्रेसची तुलना चक्क निरमा डिटरजंट पावडर या जाहिरातीमधील पोस्टर गर्लशी केली जात आहे. सध्या स्वरा तिच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. स्वराचा हा फोटो ‘वीरे दी वेडिंग’च्या म्युझिक लॉन्च इव्हेंटप्रसंगीचा आहे. या इव्हेंटमध्ये स्वरा भास्करने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला होता.
सोशल मीडियावर स्वराचा हा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, तिची तुलना निरमा गर्लशी केली जात आहे. तिच्या या फोटोला कॉमेण्ट देताना एका यूजरने लिहिले की, ‘दूध सी सफेदी निरमा से आए रंगीन कपड़ा भी खिल खिल जाए.’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘नीरमावाली दीदी मिळाली.’ स्वराने या फोटोवर उत्तरही दिले. तसेच तो फोटो सोशल मीडियावरही शेअर केला. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, खूप छान आॅबजरवेशन, या फोटोमुळे मला माझे लहानपणीचे स्वप्न आठवले.