breaking-newsराष्ट्रिय
यादव पितापुत्रांना घर खाली करण्यास वेळ हवा

- सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने उत्तरप्रदेशातील माजी मुख्यमंत्र्यांना सरकारने दिलेली निवासस्थाने खाली करण्याचा आदेश दिला आहे. तथापी मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव या पितापुत्रांनी आम्हाला ही घरे खाली करण्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयात केला आहे. गेल्या 7 मे रोजीच त्यांनी हा अर्ज केला आहे तथापी त्यावर अजून निर्णय झाला नाही.
उत्तरप्रदेशात माजी मुख्यमंत्र्यांना ते पदावरून पाय उतार झाल्यानंतरही त्यांना सरकारी बंगले कायम करण्याचा निर्णय तेथील विधीमंडळातील ठरावानुसार घेण्यात आला होता. पण सर्वोच्च न्यायालयाने ही तरतूद रद्दबातल करून सर्व माजी मुख्यमंत्र्यांना तातडीने घरे खाली करण्याचे आदेश दिले आहेत. यावर यादव पितापुत्रांनी घरे खाली करण्यासाठी तब्बल दोन वर्षांचा अवधी मागितला आहे.