यवतमाळ जिल्ह्यातील अपघातात अकरा जण ठार

मुंबई – यवतमाळ जिल्ह्यातील कोसदानी घाटात आज एक कार आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात अकरा जण ठार झाले आहेत. त्यात सहा महिलांचा समावेश आहे. कार मधील प्रवासी सचखंड गुरूद्वारा नांदेड येथे दर्शनाला निघाले होते.
आज पहाटेच्या सुमाराला त्यांच्या गाडीला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. ठार झालेले प्रवासी हरियाना, दिल्ली आणि नागपुरचे रहिवासी होते अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. मुळात हे सर्व जण एका लग्न समारंभासाठी येथे आले होते तेथून ते नांदेडला दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी वाटेत हा अपघात झाला.
ट्रक अतिशय भरधाव वेगाने या घाटातून जात असताना त्यांनी या प्रवाशांच्या गाडीला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की त्यातील दहा जण जागीच मरण पावले. एक गंभीर जखमी झालेल्या मुलीला रूग्णालयात दाखल करण्यात आले पण तिथे तिचेही उपचार सुरू असताना निधन झाले. या अपघाताच्या स्थळापासून 12 किमी अंतरावर लष्कराचे एक पोलिस ठाणे आहे स्थानिक लोकांनी त्यांना प्रथम या घटनेची माहिती कळवली. त्यानंतर त्यांनी पोलिसांची कुमक मागवून घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर ट्रक चालक फरारी झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.