breaking-newsमहाराष्ट्र

यवतमाळमध्ये भीषण अपघात ; 10 जण जागीच ठार

यवतमाळ : नागपूर-तुळजापूर महामार्गावर ट्रक आणि तवेरा गाडीचा पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जण जागीच ठार, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पंजाबमधील नागरिकांचा समावेश असून ते सर्वजण नांदेड येथील हुजूर साहीब गुरुद्वारा येथे दर्शनासाठी निघाले होते.

ट्रक आणि तवेरा गाडीची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला. अपघातामधील मृतांमध्ये चार पुरुष, चार महिला आणि दोन मुलींचा समावेश आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button