पिंपरी / चिंचवड

यमुनानगर येथे पत्नी, सासू, सास-याच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

पतीच्या त्रासाला कंटाळलेल्या पत्नीने आणि तिच्या आई-वडिलांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला. निगडी यमुनानगर येथे कौंतेय  सोसायटी समोरील रस्त्यावर शनिवारी (दि. 15) रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली.
पेन्नस जॉन मनतोडे (वय 29, रा. स्कीम नं. 10, रुम नं. 2, कौंतेय सोसायटी, यमुनानगर, ओटा स्कीम, निगडी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी क्रिस्टीना पेन्नस मनतोडे (वय 28), सासू लुसीया सूर्यकांत बोर्डे (वय 55), सासरा सुर्यकांत संतोष बोर्डे (वय 58) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अमोल भादु साळुंके यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेन्नस आणि क्रिस्टीना यांचा पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांची ओळख पिंपरीत झाली होती. तीन वर्षापासून ते विभक्त राहत होते. त्यांना तीन वर्षांची एक मुलगी आहे. पेन्नस पूर्वी खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता. लग्नानंतर मुंबईतील हवामानामुळे क्रिस्टीनाला त्रास होऊ लागल्याने त्याने मुंबईतील घर विकून निगडी येथे घर घेतले. क्रिस्टीना आणि पेन्नस हे क्रिस्टीनाच्या आई-वडिलांच्या घराजवळ असलेल्या घरात राहत होते. पेन्नसला दारुचे व्यसन असल्याने तो रोज दारु पिऊन घरी येत होता. पेन्नस याला आई-वडील नसल्याने तो मुंबईत काका-काकूंजवळच राहत होता. मुंबईतही तो रोज दारु पित होता, परंतु त्या ठिकाणी काका-काकू असल्याने प्रमाण कमी होते. निगडीत स्वतंत्र राहू लागल्याने त्याचे दारुचे व्यसन वाढले.
दारुच्या नशेत तो पत्नीला शिवीगाळ करुन मारहाण करत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून तीन वर्षांपूर्वी क्रिस्टीना तिच्या आई-वडिलांकडे रहायला आली होती. तिच्या आई-वडिलांच्या घरी येऊन तो शिवीगाळ आणि मारहाण करत होता. त्याला अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न करूनही त्याच्या वर्तणुकीत सुधारणा होत नव्हती.
दरम्यान, घटनेच्या दिवशी देखील पेन्नस हा दारू पिऊन आला होता. त्यावेळी देखील त्याने पत्नी क्रिस्टीना व त्याच्या सासू-सास-यांना शिवीगाळ केली. त्याला समजावून सांगण्यासाठी तिचे आई-वडील गेले असता त्यांच्या वाद निर्माण झाले. त्यावेळ क्रिस्टीना घरातमध्ये मुली सोबत होती. पेन्नस हा आई-वडिलांशी वाद घालत असल्याचे पाहून ती बिल्डींगच्या खाली आली. येताना तिने घरातील लोखंडी पाना आणि लाल मिर्ची घेऊन आली. त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु तो ऐकण्याच्या तयारीत नव्हता. या दरवेळेसच्या होणा-या त्रासाला कंटाळून क्रिस्टीना त्याच्या अंगावर मिर्ची पूड टाकून लोखंडी पान्याने डोक्यात घाव घातला. तर तिच्या आई-वडिलांनी सिमेंट ब्लॉक तसेच कपडे धुण्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारा पूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button