breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘म्हाडा’ची महागडी दिवाळी भेट!

,३८४ घरांची सोडत, १४ लाख ते पावणेसहा कोटी रुपये किंमत

मुंबई गृहनिर्माण मंडळाने अखेर १३८४ घरांची सोडत शनिवारी जाहीर केली. या सोडतीत पावणेसहा कोटींची दोन घरे आणि एक कोटीपेक्षा अधिक किमतीची ५० हून अधिक घरे अशी मध्यमवर्गीयांसाठी महागडी दिवाळी भेट म्हाडाने जाहीर केली आहे.

अल्प उत्पन्न गटातील घरांची किमत २० ते ३५ लाखांपर्यंत तर मध्यम उत्पन्न गटातील घरांची किमत ३५ ते ६० लाख रुपये आहे. ही परवडणारी घरे असल्याचे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत आणि मुंबई मंडळाचे मधु चव्हाण यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेत जाहीर केले. घरांच्या किमती २५ ते ३० टक्क्यांनी कमी केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

या सोडतीत अत्यल्प गटासाठी ६३ सदनिका, तर अल्प गटासाठी ९२६ सदनिका आहेत. मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी अनुक्रमे २०१ आणि १९४ सदनिका आहेत. या घरांची सोडत १६ डिसेंबर रोजी गृहनिर्माण भवनात ऑनलाइन काढली जाणार आहे. या सोडतीतील तपशिलाची जाहिरात सोमवारी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याच वेळी ऑनलाइन अर्ज नोंदणीही सुरू होणार आहे. यासाठी १० डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. या घरांपैकी फक्त २६३ घरांना भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे, तर १११२ सदनिकांची रेराअंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे. ही घरे लवकरच तयार होतील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

किंमत फक्त ५ कोटी ८० लाख !

सर्वाधिक किमतीची सदनिका ग्रँट रोड येथील कंबाला हिल परिसरातील धवलगिरी या प्रकल्पात आहे. या ९८६ चौरस फूट सदनिकेची किंमत पाच कोटी ८० लाख आहे. सर्वात कमी किमतीची सदनिका चांदिवली, पवई येथे आहे. १७९ चौरस फुटांच्या या घराची किंमत १४ लाख ६१ हजार आहे. पावणेसहा कोटीची दोन घरे इमारत दुरुस्ती मंडळाकडून म्हाडाला मिळाली आहेत. याशिवाय म्हाडाला मिळालेल्या ५० घरांची किंमत एक कोटीपर्यंत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. म्हाडाच्या घरांच्या किमती कमी असल्याचा दावाही सामंत आणि चव्हाण यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button