breaking-newsराष्ट्रिय
…म्हणून रवींद्र जडेजाच्या पत्नीला पोलीस कॉन्स्टेबलने केली मारहाण

गांधीनगर : क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नीला एका पोलीस कॉन्स्टेबलने मारहाण केली. गुजरातच्या जामनगरमध्ये शारु सेक्सशन रोडवर ही घटना घडली. छोटयाशा अपघातानंतर संतप्त झालेल्या या पोलीस कॉन्स्टेबलने जडेजाची पत्नी रिवा सोळंकीला मारहाण केली.
रिवाच्या बीएमडब्ल्यू कारने कॉन्स्टेबलच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर संतप्त झालेला पोलीस कॉन्स्टेबल त्याच्या मोटारसायलकवरुन उतरला व त्याने थेट जडेजाच्या पत्नीला मारहाण सुरु केली. संजय अहीर असे या कॉन्स्टेबलचे नाव आहे. या मारहाणीत रिवा जखमी झाली आहे असे पोलीस अधीक्षक प्रदीप सीजुल यांनी सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.