breaking-newsमनोरंजन

…म्हणून मी सिनेमांमधील नग्नता आणि किसिंग सीनपासून लांबच राहतो- सलमान खान

बॉलिवूडचा ‘दबंग’ खान अर्थात सलमान सिनेमांमधील त्याच्या अॅक्शन सीनसाठी जास्त ओळखला जातो. सिनेमांमध्ये अॅक्शनवर अधिकाधिक भर देताना मी किसिंग सीन आणि न्यूडिटीपासून चार हात लांबच राहतो, असं सलमान म्हणाला. यामागचं कारण सलमानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.

‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, ‘आतासुद्धा सिनेमांमध्ये जेव्हा किसिंग सीन येतो, तेव्हा कुटुंबीयांसोबत पाहताना विचित्र वाटतं. नग्नता आणि किसिंग सीन नसलेल्या सिनेमांवरच मी माझं लक्ष केंद्रीत करू इच्छितो. माझ्या बॅनरअंतर्गत निर्मित होणाऱ्या सिनेमांमध्ये अॅक्शन, रोमान्स, खट्याळपणा असावा असं मला वाटतं. जर माझा कोणता सिनेमा ‘A’ प्रमाणपत्राचा असेल तर तो त्यातील अॅक्शन दृश्यांमुळे असावा. सिनेमांमधील किसिंग सीन आणि न्यूडिटीपासून मी लांबच राहतो.’

या मुलाखतीत सलमानने स्वत:ला उत्तम अभिनेता नसल्याचंही म्हटलं. ‘माझ्यापेक्षा शाहरुख खान आणि आमिर खान दमदार अभिनेते आहेत. दोघांचा एखादा चित्रपट फ्लॉप असू शकतो पण नेहमीच त्यांचा परफॉर्मन्स उत्तम असतो. माझ्याबाबतीत असं घडत नाही. माझ्यात जेमतेम अभिनय कौशल्य आहे आणि नशीबामुळे मी या इंडस्ट्रीत टिकतोय,’ असं तो पुढे म्हणाला.

सलमान सध्या त्याच्या आगामी ‘दबंग ३’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. माहेश्वरमध्ये नुकतंच त्याचं शूटिंग पार पडलं. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभुदेवा करत असून यामध्ये सलमानसोबत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिका साकारत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button