breaking-newsमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

….म्हणून अंगावरचे कपडे काढले, गोंधळ घालणाऱ्या मॉडेलचा खुलासा

२७ ऑक्टोबरच्या रात्री एका मॉडेलने ओशिवरा भागातील उच्चभ्रू सोसायटीत अंगावरचे कपडे काढून पोलीस आणि सुरक्षा रक्षकांसोबत हुज्जत घातल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या मॉडेलने आता त्या रात्री काय घडले ते सांगितले आहे. माझ्यावर बलात्कार तर होणार नाही ना? या भीतीने आणि मी माझ्या अंगावरचे कपडे काढले. पोलीस मला पहाटे अडीच वाजता सांगू लागले होते की तुला आत्ता आमच्यासोबत यावे लागेल. त्यांच्यासोबत महिला पोलीसही नव्हत्या, मग मी कशी काय जाऊ? या सगळ्या गोंधळात काय करावे ते सुचले नाही म्हणून मी अंगावरून नाइट ड्रेस काढला आणि तुमच्यासोबत येणार नाही असे सांगितले. ज्यानंतर पोलीस निघून गेले, नेमके काय करावे ते सुचत नव्हते म्हणून कपडे काढल्याचं या मॉडेलने म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ

ANI

@ANI

: Model Megha Sharma, who in a viral video was seen thrashing a security guard and sitting in protest when the police came to take her, narrates the chain of events which took place at the time of the incident.

ही मॉडेल मी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला मी सिगारेट आणण्यास सांगितले. त्याने ड्युटीवर असल्याचे कारण देत सिगारेट आणण्यास नकार दिला. त्यानंतर मी पाहिले की इमारतीच्या गेटबाहेर आणखी काही सुरक्षा रक्षक होते तेव्हा मी त्याला विनंती केली की तू ड्युटीवर आहेस तर इतर कोणाला पाठवू शकतोस का? त्याने त्यालाही नकार दिला आणि मला सिगारेट विकणाऱ्याचा नंबर दिला. मी त्या नंबरवर फोन केला पण रात्रीचा १ वाजला होता त्यामुळे बहुदा तो झोपला असावा. त्यानंतर मी स्वतः बाहेर गेले आणि सिगारेट्स घेऊन आले.

जेव्हा मी सिगारेट्स घेऊन परत आले तेव्हा मी सुरक्षा रक्षकाला एवढेच म्हटले की मला आत्ता यावेळी सिगारेट्स आणण्यासाठी जावे लागले तुमच्यापैकी कोणी जाऊ शकले असते तर बरं झालं असतं. तर तो माझ्याशी आवाज चढवून बोलू लागला. रात्री एक वाजता सिगारेट आणण्यासाठी इमारतीबाहेर जाणारी तू चरित्रहीन मुलगी आहेस. तू काही राजकुमारी नाहीस की आम्ही तुला सिगारेट्स आणून देऊ. तो माझ्याशी अत्यंत उद्धटपणे बोलत होता ज्यामुळे माझाही आवाज चढला. त्यावेळी मला राग आला आणि मी त्याला थोबाडीत ठेवून दिली. आमच्यात मारामारीही झाली हा सगळा प्रकार पाहून इतर वॉचमन तिथे आले त्यांनी आमची मारामारी सोडवली. मग ते तीन ते चार जण मिळून मला शिव्या देऊ लागले. ज्यानंतर मी तातडीने पोलिसांना फोन केला.

मी फोन केल्यावर दहा मिनिटात पोलीस त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी मला हा सगळा काय प्रकार ते विचारले जे मी त्यांना सांगितले. तोपर्यंत रात्रीचे २.३० वाजले होते. पोलिसांनी काय घडले हे जसे मला विचारले होते तसेच त्या वॉचमनलाही विचारले मात्र तो एकही शब्द बोलायला तयार नव्हता तो पोलिसांशीही उद्धटपणे वागला. मग पोलिसांनी मला पोलीस ठाण्यात यावे लागेल असे म्हटले. त्यांना मी सांगितले की आत्ता एवढ्या रात्री मी येऊ शकणार नाही कारण तुमच्यासोबत महिला पोलीस नाही मी सकाळी येते. एका पोलिसाने ही गोष्ट मान्य केली. मात्र इतर पोलीस मला त्याच वेळेला पोलीस ठाण्यात चल असे सांगू लागले. त्या ठिकाणी चार वॉचमन आणि चार पोलीस यांच्या गराड्यात मी सापडले. काय करावे ते मला सुचले नाही आणि म्हणूनच मी कपडे उतरवले असे या मॉडलने म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button