Mahaenews

मोहम्मद तुघलकच्या काळातील ऐतिहासिक स्मारक बनले शिव मंदिर

Share On

नवी दिल्ली : मोहम्मद तुघलकच्या काळातील ऐतिहासिक वारसा असलेले स्मारक शिव मंदिर बनले आहे. दोन महिन्यांपूर्वी कोणाला काहीही कळू न देता या स्मारकाला शिव मंदिरामध्ये बदलण्यात आले. गुमती नावाचे हे स्मारक दिल्लीच्या सफदरजंग एन्क्लेव हुमायूपूर गावामध्ये आहे. मार्च महिन्यात या स्मारकाची सफेद आणि भगव्या रंगाने रंगरंगोटी करुन त्यामध्ये मुर्त्या ठेवण्यात आल्या. पुरातत्व विभागाच्या सिटीजन चार्टर नियमांचे हे उल्लंघन आहे.

सिटीजन चार्टरच्या नियमानुसार तुम्हाला ऐतिहासिक स्मारकामध्ये रंगकाम, दुरुस्तीला मनाई आहे. दरम्यान , यासंबंधी दिल्ली सरकारच्या पुरातत्व विभागाकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांनी यासंबंधी आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणी संबंधित विभागाला चौकशी करायला सांगून त्यांच्याकडून अहवाल मागवून घेईन असे त्यांनी सांगितले.

Exit mobile version