breaking-newsराष्ट्रिय
मोबाइलमध्ये विजेचा फोटो काढणं ‘त्या’च्या जीवावर बेतलं

मदुराई : मुसळधार पाऊस सुरू असताना कडाडणाऱ्या विजांचा फोटो काढताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूच्या थिरुवल्लूर जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. एच.एम.रमेश या ४३ वर्षीय व्यक्तीचा या घटनेमध्ये मृत्यू झाला आहे. ते चेन्नईचे रहिवासी होते. विजा चमकत असताना रमेश यांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये विजांचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. फोटो काढण्याच्या प्रयत्नात असतानाच वीज रमेश यांच्यावर पडली आणि ते खाली कोसळले.
दरम्यान, मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर थिरुवल्लूर जिल्हा पोलिसांनी नागरिकांना विजांचे फोटो न काढण्याच्या सूचना केल्या आहेत.