Views:
337
मुंबई : आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आतापर्यंत निम्म्याहून जास्त व्यंगचित्रांतून मोदी-शहांवर टीकेचा भडीमार केला आहे. दिल्लीच्या ड्रेसिंगरुमनंतर मोदी आणि शहा यांना राज ठाकरेंनी थेट पंपावर आणून उभे केले आहे.
सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरात उच्चांकी वाढ केल्याने सामान्य जनतेत संतापाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर सरकारविरोधात टीकेचा प्रचंड भडीमार होऊ लागला आहे. सरकारचा तीव्र निषेध केला जात आहे. हेच का ते ‘अच्छे दिन’, असा सवाल जनता करू लागली आहे. यावर राज ठाकरे यांनी बाबांनो हेच ते अच्छे दिन! म्हणत व्यंगचित्रातून केंद्र सरकारवर टीका केली आहे.
राज ठाकरे यांनी व्यंगचित्रात पंतप्रधान मोदी आणि अमित शहा सर्वसामान्य नागरिकांकडून पेट्रोल पंपावर पैसे वसूल करत असल्याचे दाखवले आहे. यामध्ये सर्वसामन्यांना धाक दाखवून केंद्रसरकार हँडस् अप! म्हणत पैशांची मागणी करताना दिसत आहे.
Like this:
Like Loading...