breaking-newsआंतरराष्टीयराष्ट्रिय

मॉलमध्ये डिस्काउंट न दिल्याने दोघांची हत्या

खरेदी केलेल्या कपड्यांवर सवलत न दिल्यामुळे एका व्यक्तीने मॉलमधील दोन सेल्समनची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील जेएचव्ही मॉलमध्ये झालेल्या या घटनेत अन्य दोन जण जखमी झाल्याचीही माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी(दि.३१) संध्याकाळी जेएचव्ही मॉलमधील एका कपड्या्च्या दुकानात सामानाची विक्री करणारा सेल्समन आणि खरेदी करण्यासाठी आलेल्या दोघांमध्ये डिस्काउंट न दिल्यामुळे वाद झाला. थोड्याच वेळात हा वाद शिगेला पोहोचला आणि दोघांपैकी एका व्यक्तीने बंदूक काढली आणि दोन जणांवर गोळीबार केला, यामध्ये अन्य दोघंही जखमी झाले. मृतांची ओळख पटली असून सुनील आणि गोपी अशी त्यांची नावं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर गोलू आणि विशाल हे दोघं जखमी असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय.

मॉलमध्ये ऐन गर्दीच्या वेळी ही घटना झाल्याने एकच दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे दुकानं लवकरच बंद करण्यात आली आणि मॉल रिकामा करण्यात आला. या घटनेत अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. मात्र, सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेतला जाईल, तसंच त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्यांकडूनही माहिती गोळा केली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

ANI UP

@ANINewsUP

Varanasi: Unidentified armed men opened fire at a garment shop in JHV Mall under Cantt police station limits today. 2 people died, 2 admitted in a hospital under critical condition.

ANI UP

@ANINewsUP

Varanasi: Unidentified armed men opened fire at a garment shop in JHV Mall under Cantt police station limits today. Police says, “2 people have died in the incident, we are examining the CCTV footage and a thorough investigation will be done.” pic.twitter.com/r9Cc02EuKK

View image on TwitterView image on Twitter

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button