breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

मैलावाहिनीचा नागरीकांना त्रास; आरोग्य धोक्यात

पिंपरी – दापोडी येथील  तेजसिंग पेट्रोल पंपाच्या पाठीमागे ख्रिश्चन स्मशानभूमी व कडबाकुट्टीजवळ मैला वाहिनी तुटुन तुंबल्याने परिसरात दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे येथील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महापालिका व रेल्वे प्रशासन हद्दीच्या वादात येथील हा प्रश्न गेली अनेक दिवसांपासुन प्रलंबित आहे. याचा त्रास मात्र येथील रहिवाशी नागरीकांना सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासन आमचे काम नाही म्हणत हात झटकतेय तर महापालिका काम करावयास गेल्यास आमच्या हद्दीत परवानगी शिवाय काम करू नये अशी भुमिका घेत असल्याने येथील तुंबलेल्या ड्रेनेज मैलावाहिनीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास अडचणी येत आहेत.

याबाबत मानव अधिकार संस्थेचे महाराष्ट्र सचिव नरेश आनंद यांनी संबंधित प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार केली, मात्र फक्त उडवा-उडवीची उत्तरे मिळतात. पावसाळा सुरु होण्यापुर्वी नवीन ड्रेनेज लाईन टाकून येथील ड्रेनेजची समस्या मार्गी लावावी अशी मागणी त्यांनी नागरीकांच्या वतीने केली आहे. पावसाळ्यात हा प्रश्न गंभीर स्वरूपाचा होऊन स्थानिक रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो.

याबाबत नगरसेविका माई काटे म्हणाल्या, येथील स्वच्छता नुकतीच करण्यात आली आहे. आरोग्य विभाग व स्थापत्य विभागाला याच्या सुचना दिल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने येथील काम करण्यास परवानगी द्यावी.आम्ही तात्काळ हा प्रश्न मार्गी लावु.अरूंद रस्ता,ख्रिश्चन बांधवांची दफनभुमी यामुळे येथे गाडी जाण्यास अडचणी येतात.याआधी काम करत असताना रेल्वेकडुन अडवणुक करण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून येथील प्रश्न कायमचा सोडविण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button