breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मैलामिश्रित पाण्याने पवना नदीपात्र झाले अतिप्रदूषित

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  शहरातील सांडपाणी आणि मैलामिश्रीत पाण्याच्या वाढलेल्या प्रमाणामुळे पवना नदीची प्रदुषण पातळी वाढत चालली आहे. पवना नदीतील पाणी दुर्गंधीत, प्रदूषित व गटारमय झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे महापालिकेने नदीपात्रात सोडले जाणारे लाखो लिटर सांडपाणी व मैलापाणी पाण्यावर प्रक्रिया होत नसल्याचे दिसत आहे.  

चिंचवड, भोसरी औद्योगिक वसाहतीतील वाहून येणारे रसायनमिश्रित सांडपाणी त्याशिवाय, बोपखेल, ताथवडे, थेरगाव, पिंपरी येथील नाल्याचे पाणीदेखील थेट नदीपात्रात मिसळत असल्याने पवनेचे पाणी प्रदूषित होत आहे. रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होऊन जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातून २४.५ किलोमीटर अंतरात पवना नदी वाहते. पवना नदी किवळे, रावेत येथे शहरात प्रवेश करून चिंचवड, पिंपरी, पिंपळे सौदागर, रहाटणी मार्गे सांगवी, दापोडी-हॅरिस पुलाजवळ मुळा नदीला मिळते. वाल्हेकरवाडी येथील जाधव घाट लगत असणाºया नाल्यातून पवना नदीपात्रात थेट नाल्याचे पाणी मिसळत असल्याचे पाहणीत आढळले.

पवना नदीकाठच्या नाल्यांमध्ये विशेषत: झोपडपट्ट्यांतून थेट जमा होणारे सांडपाणी मिसळते. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सध्या शहरामध्ये ९ ठिकाणी १३ मैलाशुद्धीकरण केंद्र आहेत. शहरातील दरडोई पाणीपुरवठ्याचा दर, वाढती लोकसंख्या, यातून निर्माण होणारे सांडपाणी आणि मैलापाण्याच्या तुलनेत कार्यरत असलेली मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रे अपुरी आहेत. शहरात टाकलेल्या मलनिस्सारण नलिकांची लांबी १४७२ कि.मी. इतकी असून, सध्या प्रक्रिया करण्यात येणारे सांडपाणी दररोज जवळपास ३०० दशलक्ष लिटर इतके आहे. दररोज जवळपास ३०० दशलक्ष लिटर मैलापाणी निर्माण होते. शहरात सध्या प्रतिदिन २३० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करणारी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे कार्यरत आहेत. उरलेले पाणी थेट नदीत सोडले जाते. महापालिकेने उभारलेल्या प्रकल्पाच्या कार्यक्षमतेबद्दल वाद आहेत. शहरातून निर्माण होणाºया मैलापाण्यातील ५० टक्के पाणी थेट नदीत सोडले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button