मेट गालामधील प्रियंकाच्या ड्रेसवर तिची आई म्हणते…

संपूर्ण फॅशन आणि कलाविश्वाचं लक्ष लागून राहिलेला मेट गाला २०१९ हा सोहळा नुकताच पार पडला. कलाकारांची मांदियाळी आणि कल्पनाशक्तीपलीकडे जाणारी फॅशन अशी एकंदर सांगड या सोहळ्याच्या निमित्ताने घातली गेल्याची पाहायला मिळाले आहे. न्युयॉर्कमधील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘मेट गाला २०१९’मध्ये यावेळी ‘नोट्स ऑन फॅशन’ ही थीम ठेवण्यात आली होती. या मेट गालासाठी भारतीय अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिचा पती निक जोनासबरोबर गेली होती. यावेळी प्रियंकाने घातलेल्या ड्रेसने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. प्रियंकाच्या आई मधू चोप्रा यांनी प्रियंकाच्या ड्रेसची प्रशंसा केली आहे.
प्रियंकाची आई मधू चोप्रा यांना मीडियासह संवाद साधताना प्रियांकाच्या ड्रेसची चांगलीच प्रशंसा केली आहे. ‘प्रियंका आता माझ्या जवळ नाही. त्यामुळे माझा आनंद मी तिच्यासमोर व्यक्त करु शकत नाही. मात्र जर आता ती माझ्या जवळ असती तर मी तिला जवळ घेतले असते आणि तोंडभरून तिचे कौतुक केले असते. मेट गालामध्ये प्रियंका प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती’ असे त्या म्हणाल्या.
यंदाच्या मेट गाला सोहळ्याची ‘नोट्स ऑन फॅशन’ अशी थीम ठेवण्यात आली होती. त्या थीमच्या अनुशंगाने बॉलिवडची देसी गर्ल प्रियंकाने avant-garde silver Dior गाऊन परिधान केला होता. तिचा हा गाऊन मिमी कट्रेलने तिच्या लूकसाठी स्टायलिंग केले होते. ती या गाऊनमध्ये अत्यंत ग्लॅमरस आणि हटके अंदाजात दिसत होती. परंतु काही नेटकऱ्यांनी तिला या लूकवरुन ट्रोल ही केले आहे.