breaking-newsपिंपरी / चिंचवड

मेट्रोच्या कामासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल

पिंपरी – पुणे-मुंबई महामार्गावर कासारवाडी सब-वे जवळ महामेट्रोचे काम दि.29 मे पासून सुरु होणार आहे. या कामामुळे वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार कासारवाडी सब-वेजवळ महामेट्रोच्या कामामुळे कासारवाडी, सांगवी, पिंपळे-गुरव कडे जाणारी दुचाकी, चारचाकी वाहने व पीएमपीएल बसेस यांनी सेवा रस्त्याचा वापर करावा.

इतर सर्व वाहनांनी सॅंडविक कंपनीजवळील मर्ज इन होऊन ग्रेड सेपरेटर रस्त्याचा वापर करावा. तसेच रहदारीस अडथळा होऊ नये म्हणून पुणे-मुंबई महामार्गावरील सॅंडविक कंपनी ते सांगवी, पिंपळे-गुरवकडे जाणारा नाशिक फाटा येथील अप-रॅम्पपर्यंत सेवा रस्त्यावर नागरिकांनी वाहने पार्क करु नयेत व मेट्रोच्या कामास सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button