breaking-newsमनोरंजन

मेघानं ‘बिग बॉस’च्या खेळात डॉक्टरेट पदवी मिळवल्याचं दिसतंय – अनुप जलोटा

‘पण, मला घरातून बाहेर काढल्याबद्दल मेघाला खूपच वाईट वाटलं, तिनं यासाठी माझी माफी देखील मागितली. घरातील इतरांच्या तुलनेत मला समजून घेणं तिला अवघड गेलं, म्हणूनच मेघानं मला नॉमिनेट केल्याचं तिनं मला सांगितलं’ असं अनुप घरातून बाहेर पडल्यानंतर ‘दी इंडियन एक्स्प्रेसशी’ बोलताना म्हणाले. पण याचवेळी मेघा बिग बॉस जिंकू शकत नाही असा दावाही त्यांनी केला.

‘मेघानं या खेळात डॉक्टरेट पदवी मिळली आहे. नेमकं काय करायचं हे तिला चांगलच माहिती आहे. मात्र मधूनच खेळात सहभागी झालेले खेळाडू कधीही जिंकत नसतात’ असं म्हणत मेघाची जिंकण्याची संधी ही खूपच कमी असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. मेघा धाडेनं मराठी बिग बॉसचा किताब जिंकला. त्यावेळी घरात प्रवेश केल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच तिनं आपल्या खेळीनं सगळ्यांचं मन जिंकलं. ती बिग बॉस मराठीमध्येही पूर्णपणे अभ्यास करूनच आली होती अनेकदा इतर स्पर्धकांनीही म्हटलं होतं. तिनंही बिग बॉसच्या घरात आपण केवळ जिंकण्यासाठीच प्रवेश केला होता हेही खुलेपणानं मान्य केलं.

पण हिंदी बिग बॉसमध्ये मेघाला अनेक प्रतिस्पर्धकांचा सामना करावा लागणार आहे. तेव्हा अनुप जलोटांचा दावा खोटा ठरवत हिंदी बिगमध्येही मेघा बाजी मारते का हे पाहणं  आता औत्सुक्याचं ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button