breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

मेक्‍सिको निवडणुकीत उमेदवाराची हत्या – दहा दिवसातील 6वी हत्या

मेक्‍सिको  – मेक्‍सिको राज्य विधानसभेच्या निवडणुकीतील एका उमेदवाराची काल गोळ्या घालून हत्या करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्य विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत गेल्या दहा दिवसातील ही सहावी राजकीय हत्या असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आगामी रिाज्य विधानसभा नवड्‌णुकीतील एक उमेदवात ऍबेल मॉंटुफर मेंडोसा यांचा मृतदेह काल पोलीसांना सापडला. त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती आणि कंमरेखालचा देह विवस्त्र होता. गेल्या दहा दिवसातील ही सहावी राजकीय हत्या असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

नगराध्यक्ष ऍबेल मॉंटुफर मेंडोसा हे ग्युरेरो राज्य विधानसभेसाठी निवडणूक लढवत होते. सियुदाद अल्तॅमिरनो शहरातील रस्त्यावर त्यांच्या मोटरगाडीत त्यांचा मृतदेह सापडल्याची आणि बंदुकीच्या गोळ्यांनी त्यांच्या शरीराची चाळणी केल्याची माहिती राज्याच्या पोलीसदलाचे प्रवक्ते रॉबर्टो अल्वारेझ यांनी दिली आहे. ऍबेल मॉंटुफर मेंडोसा हे पीआरआय (इस्न्टिट्यूशनल रिव्हॉल्युशनरी पार्टी) पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते. 1 जुलै 2018 रोजी मतदान होणार असलेली ही निवडणूक लढवणाऱ्या किमान 6 उमेदवारांची हत्या गेल्या दहा दिवसात, म्हणजे 29 एप्रिलपासून करण्यात आली आहे, तर निवडणुकीचा मोसम सुरू झाल्यापासून म्हणजे सप्टेंबर 2017 पासून आणखी डझनभर हत्या झालेल्या आहेत.

सार्वजनिक सुरक्षा हा मेक्‍सिकोमधील एक ज्वलंत मुद्दा आहे. गेल्या वर्षभरात मेक्‍सिकोमध्ये 25,000 खुनांची नोंद झालेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button