breaking-newsआंतरराष्टीय
मेक्सिकोत अज्ञात बंदुकधाऱ्यांकडून सहा ट्रॅफिक पोलीसांची हत्या

मेक्सिको (मेक्सिको) – मेक्सिकोमध्ये अज्ञात बंदुकधाऱ्यांनी सहा ट्रॅफिक पोलीसांची हत्या केल्याची माहिती गिर्लमो ऍल्डोनाडो नावाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. अलीकडच्या काळात सुरक्षाकर्मीवरचा हा सर्वात जास्त घातक हल्ला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. सलामंका भागात दिवसा ढवळ्या एका सफेद वाहनातून आलेल्या तीन बंदूकधाऱ्यांनी या हत्या केल्याची माहिती मीडियाने दिली आहे.
गेल्या वर्षी मेक्सिकोमध्ये विक्रमी हत्या झालेल्या होत्या, परंतु या वर्षी गेल्या वर्षीचा हत्यांचा विक्रम मोडीत निघाला आले. सलमंका येथे पेमेक्स कंपनीच्या सहा रिफायनऱ्यांपैकी एक रिफायनरी आहे, अशा भागात इंधनचोरी आणि गुंडांच्या टोळ्यांच्या चकमकींसारख्या घटना अधून मधून होतच असतात.
सहा ट्रॅफिक पोलीसांच्या हत्येमागील नेमके कारण् समजू शकलेले नाही.