breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मेंदूचे अतिसुक्ष्म निदान; पिंपरीतील ‘वायसीएम’ रुबी अलकेअरमध्ये तपासणीची सोय

सर्वसामान्य नागरिकांचे कमी खर्चात होतेय एम.आर.आय., चोवीस तास सेवा उपलब्ध

विकास शिंदे

पिंपरी |महाईन्यूज|

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील रुबी अलकेअर सर्व्हिसेसमध्ये योग्य दरात मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (MRI) ची सोय करण्यात आली आहे. महापालिकेने निश्चित केलेल्या सवलतीच्या दरात तपासणी करण्यात येत असून सर्वसामान्य रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रुबी अलकेअर सर्व्हिसेसचे संचालक अपुर्व शहा यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात 2009 पासून रुबी अलकेअर संचलित मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (MRI) तपासणी केंद्र कार्यरत आहे. एमआरआय यंत्रामध्ये मेंदूमध्ये असणाऱ्या रसायनांच्या रासायनिक प्रक्रियेवरून (केमिकल कंपोझिशन) मेंदूचा अभ्यास केला जातो. प्रत्येक रासायनिक प्रक्रियेचे चुंबकीय गुणधर्म भिन्न असतात. त्या अतिसूक्ष्म गुणधर्माला विस्तारित करून मेंदूतील रासायनिक प्रक्रिया समजून घेणे शक्य होते. त्यामुळे मेंदूमध्ये जेव्हा अतिसूक्ष्म बदल घडत असतात, तेव्हा त्यांचे निदान पहिल्या टप्प्यामध्ये एमआरआय तपासणीमध्ये समजते.

अनेक आजारांच्या निदानासाठी MRI तपासणीचा उपयोग होत असतो. MRI हे मेंदु व इतर अवयवांच्या परीक्षणासाठी उपयोगात येते. त्यामुळे मेंदुचे विकार, नाडयांचे विकार, स्नायुंचे विकार, मनक्याचे विकार, सांध्यातील समस्या, लिव्हरच्या समस्या, कँसर इत्यादीच्या निदानासाठी MRI उपयुक्त ठरत आहे.

दरम्यान, एमआरआय ही खर्चिक आणि वेळ लागणारी प्रक्रिया आहे. एका एमआरआयला साधारणपणे १५ मिनिटे ते एक तासापर्यंतचा वेळ लागू शकतो. सीटी स्कॅनपेक्षा संवेदनशील असतो. मेंदूमधील अतिसूक्ष्म बदलांचे निदान यामध्ये करता येत असल्याने मेंदूचा टय़ूमर आणि आकडीच्या सुरुवातीच्या लक्षणाचे निदान एमआरआयमुळे योग्य करता येते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी रुबी अलकेअर एमआरआय सेंटरचा लाभ घ्यावा, असेही शहा यांनी म्हटले आहे.

MRI सेंटरमध्ये ही घ्यावी काळजी…

एमआरआय तपासणीपूर्वी डाॅक्टर आपणास काही सूचना देतील. तपासणीआधी आपल्याजवळील अंगठी, चैन, लॉकेट वैगरे मेटलच्या वस्तू बाजूला काढून ठेवाव्या लागतात. कारण, MRI मध्ये स्ट्रॉंग मॅग्नेटचा (चुंबकाचा) वापर केला जातो. स्कॅनिंगवेळी MRI मशीन खूप मोठा आवाज करत असते. त्यामुळे तपासणीवेळी न हालता शांत झोपून राहणे गरजेचे असते.

अशी होते MRI तपासणी…

मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (Magnetic Resonance Imaging) तपासणी होय. आज MRI स्कॅनिंग तपासणीचा उपयोग विविध आजारांच्या निदानासाठी केला जातो. MRI स्कॅनिंग हे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे. MRI मध्ये स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड व रेडिओ लहरींचा वापर केला जातो. त्यामुळे MRI स्कॅनिंगमध्ये शरीरातील अवयवांच्या अगदी रिमार्केबल अशा चांगल्या प्रतिमा कॉम्प्युटरद्वारे निघतात. त्या प्रतिमेवरुन एखाद्या आजाराचे निदान करण्यासाठी मदत होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button