breaking-newsक्रिडा

मुलांच्या दुहेरीत दक्ष अगरवाल – मानस धामणे विजेते

  • मुलींच्या दुहेरीत श्रुती अहलावत-वेद प्रापुर्ना अजिंक्‍य

  • एमएसएलटीए केपीआयटी अरुण वाकणकर मेमोरियल एटीएफ आशिया 14 वर्षांखालील टेनिस स्पर्धा

पुणे – एमएसएलटीए केपीआयटी अरुण वाकणकर मेमोरियल एटीएफ आशिया 14 वर्षांखालील टेनिस स्पर्धेचा आजचा दिवस गाजविला. दक्ष अगरवाल व मानस धामणे या जोडीने मुलांच्या दुहेरीत, तर श्रुती अहलावत व वेद प्रापुर्ना या जोडीने मुलींच्या दुहेरीत विजेतेपद संपादन करताना पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्यातर्फे अरुण वाकणकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

म्हाळुंगे बालेवाडी येथील एमएसएलटीए स्कूल ऑफ टेनिस येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील मुलांच्या दुहेरीतील अंतिम फेरीत दक्ष आगरवाल याने मानस धामणेच्या साथीत शिवम कदम व नितीश नल्लूस्वामी यांचा 7-5, 5-7, 10-6 असा रोमांचकारी पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. हा सामना दोन तास 20 मिनिटे रंगला. पहिल्या सेटमध्ये सामन्याच्या सुरुवातीला 2-0 अशा फरकाने पिछाडीवर असताना दक्ष अगरवाल व मानस धामणे यांनी आक्रमक खेळ करत आठव्या व दहाव्या गेममध्ये शिवम कदम व नितीस नल्लूस्वामी यांची सर्व्हिस भेदली व हा सेट 7-5 असा जिंकून आघाडी घेतली.

दुसऱ्या सेटमध्ये शिवम कदम व नितीस नल्लूस्वामी यांनी वरचढ खेळ करत सहाव्या व आठव्या गेममध्ये दक्ष अगरवाल व मानस धामणे यांची सर्व्हिस भेदली व हा सेट 7-5 असा जिंकून सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. त्यानंतर दक्ष अगरवाल व मानस धामणे यांनी सुपर टायब्रेकरमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना हा सेट 10-6 अशा फरकाने जिंकून विजेतेपदावर नाव कोरले.

मुलींच्या दुहेरीतील अंतिम फेरीच्या लढतीत श्रुती अहलावत व वेदा प्रापुर्णा यांनी हेतवी चौधरी व परी सिंग या जोडीचा 6-2, 4-6, 10-7 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेतील मुले व मुलींच्या एकेरी गटाचे अंतिम सामने उद्या (शनिवार) सकाळी 10 वाजता होणार आहेत. मुलांच्या एकेरीतील अंतिम सामना दक्ष आगरवाल व मानस धामणे यांच्यात, तर मुलींच्या एकेरीतील अंतिम लढत श्रुती अहलावत व वेदा प्रापुर्णा यांच्यात होणार आहे.

सविस्तर निकाल – मुले दुहेरी – अंतिम फेरी – दक्ष अगरवाल (भारत-3)-मानस धामणे (भारत) वि.वि.शिवम कदम (भारत-1)-नितीश नल्लूस्वामी (भारत)7 -5, 5-7, 10-6, मुले दुहेरी – उपान्त्य फेरी- शिवम कदम (भारत-1)-नितीश नल्लूस्वामी (भारत) वि.वि.कनव दवेर (भारत)-स्पर्श परमार (भारत) 6-1, 6-3, दक्ष आगरवाल (भारत-3)-मानस धामणे (भारत) वि.वि.समर मल्होत्रा (भारत-2)-क्रिषाग रघुवंशी (भारत) 6-1, 6-4,

मुली दुहेरी – अंतिम फेरी – श्रुती अहलावत (भारत-2)-वेदा प्रापुर्णा (भारत) वि.वि. हेतवी चौधरी (भारत-1)-परी सिंग (भारत) 6-2,4-6,10-7, मुली दुहेरी – उपान्त्य फेरी- हेतवी चौधरी (भारत-1)-परी सिंग (भारत) वि.वि. नुपुर गुप्ता(भारत)-काश्वी थापलीयाल (भारत) 6-0, 6-0, श्रुती अहलावत (भारत-2)-वेदा प्रापुर्णा (भारत) वि.वि. सायना देशपांडे (यूएसए)-सोनल पाटील (भारत) 6-4, 7-5 .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button