पिंपरी / चिंचवड

मुलगा-मुलगी असा भेदभाव करू नका – हभप ज्ञानेश्वर महाराज पठाडे

पिंपरी – पुरुषांच्या बरोबरीने महिला सर्वच क्षेत्रात काम करू लागल्या आहेत. महिलांनी उच्च स्थान गाठले आहे, अशा परिस्थितीत आजही घराण्याचा वंशज म्हणून मुलाकडे पाहिले जाते. ही बाब चिंतनीय आहे. समाजातील मुलींची संख्या घटण्याचे कारण ठरत आहे. मुला-मुलींचे प्रमाण समान असणे आवश्यक आहे. यातूनच समृद्ध आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती होणार आहे. यासाठी मुलगा-मुलगी असा भेदभाव करू नका, असे मत आळंदीकर युवा कीर्तनकार हभप ज्ञानेश्वर महाराज यांनी व्यक्त केले.

 

काळेवाडीतील ज्योतिबानगर येथील विठ्ठलराज मंदिरात अखंड हरिमान सप्ताहानिमित्त गुरुवार दि. 17 ते 24 मे दरम्यान कीर्तन सादर करण्यात आले. सप्ताहातील सातव्या दिवसाचे कीर्तन हभप ज्ञानेश्वर महाराज यांनी सादर केले. संत नामदेव महाराज यांचा ‘हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास’ या अभंगाचे निरुपण त्यांनी या वेळी केले. महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयाचे माजी स्वीकृत सदस्य नवनाथ नढे पाटील, नगरसेवक शत्रुघ्न काटे, कैलास बारणे, विनोद नढे, चंद्रकांत नखाते, उषा काळे, सुरेश भोईर, स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, दिलीप काळे, रमेश काळे, सुनील कुंजीर, देवाअप्पा नखाते, श्रीधर वाल्हेकर, बजरंग नढे, सुदाम नखाते, मोहन कस्पटे, गणेश कस्पटे, दिलीप जाधव, संगीता पवार, विद्या माचुत्रे, सखुबाई नढे, विजय काळे, शरद नखाते, लहू कोकणे, काळुराम काळे आदी यावेळी उपस्थित होते. प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तापकीर आणि बेबी तापकीर या दाम्पत्याचा यावेळी सत्कार करण्यात आला.

युवा किर्तनकार हभप ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की, बालवयात होणारे संस्कार हे अधिक परिणामकारक असून ते आईवडिलांकडून होत असतात. संस्कार म्हणजे शिस्त, विनम्र भाव, थोरामोठ्यांचा आदर, माणुसकी. संस्कार ही एक मनाची परिभाषा आहे. मनाची अवस्था आहे. स्वतापासून सुरू होणारा संस्कार कुटुंबाला, समाजाला, राष्ट्राला आदर्शाप्रत पोहचवू शकतो.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button