भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याचा विसर – धनंजय मुंडे

पुणे – सत्ताधारी भाजपाने निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेवर आले. परंतू, सत्तेवर येताच भाजपला 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्यांचा विसर पडला आहे, अशी टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचा 19 वा वर्धापन दिवस आणि हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपानिमित्त पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख आदी उपस्थित आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी आले आहेत.
मुंडे म्हणाले की, येत्या निवडणुकीत सत्तांतर झाल्याशिवाय राहणार नाही. या सत्तांतारात राष्ट्रवादीचा मोठा वाटा असेल. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी 1 नंबरचा पक्ष असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त ते म्हणाले की, सबका साथ सबका विकास या भाजपाच्या घोषणेवर मोठी टीका झाल्याने साफ नियत साफ विकास अशी जाहिरात आता भाजपा करतेय. परंतु आश्वासनं देऊन ती पूर्ण न केल्याने मोदींची साफ नियत नसल्याचे दिसून येते. मोदी 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात येतील, असे म्हणाले होते, परंतु 15 पैसेसुद्धा कोणाच्या खात्यात आले नाहीत.
पवारांना उद्देशून मुंडे म्हणाले, पवार साहेब आपण या 4 वर्षांतील या सरकारचे अपयशाचे पुस्तक काढून ते आपण मजुरांकडे पोहोचवू. ते टाटांकडे गेले तर आपण बाटा घालणाऱ्या सामान्य माणसाकडे जाऊ, ते कपिल देव यांच्याकडे गेले तर आपण बळी देवाकडे जाऊ. छत्रपतींच्या आशीर्वादाने आम्ही सत्तेत आलो, असे भाजपा म्हणते. राष्ट्रवादीचा 2019 चा स्थापना दिवस आपण परिवर्तन दिवस म्हणून साजरा करू, असा आशावादही मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.