breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात; मुख्यमंत्री बचावले

निलंगा – लातूर दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला आज (गुरुवार) सकाळी अपघात झाला असून, या अपघातातून मुख्यमंत्री थोडक्यात बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी निलंगा येथून उड्डाण घेत असताना मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने हेलिकॉप्टर कोसळले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह सरकारी अधिकारी हेलिकॉप्टरमध्ये होते. हेलिकॉप्टर जास्त उंचीवर नसल्याने सर्वजण बचावले आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्वतः ट्विट करत सर्वजण सुखरूप असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री सध्या मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या घरी थांबले आहेत. हेलिकॉप्टर भरकटल्याने एकच गोंधळ उडाला होता. आता सर्व सुरक्षित असल्याचे प्रशासनाने सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह श्रमदान केले होते.