breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मुख्यमंत्र्यांकडून लोकशाहिचा दिवसाढवळ्या खून – मारुती भापकर

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेला गालबोट लागणार या भितीने पोलिसांनी भापकर यांना शनिवारी (दि. 4) सकाळी राहत्या घरातून ताब्यात घेतले. तब्बल 9 तासाने त्यांना सोडण्यात आले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपणे म्हणजे दिवसाढवळ्या लोकशाहिचा खून आहे. मोदी-फडणवीस यांच्या बगलबच्यांची ही अघोषीत आनिबाणी आहे, अशा शब्दांत मारुती भापकर यांनी भाजपच्या स्थानिक आमदारांवर संताप व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेपुर्वी मागील लोकसभा-विधानसभा-महापालिका निवडणुकीत त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी निगडीतील भक्ती-शक्ती चौकात धरणे आंदोलन करणार होतो. परंतु, मुख्यमंत्री फडणवीस सरकारने आज झोपेतून उठण्याअगोदरच पोलिसांकडून मला घरातुनच अटक केली. तब्बल ९ तास झाले, मी पोलिस स्टेशनमध्ये आहे, अशी पोस्ट त्यांनी आपल्या फेसबुकवर काल शनिवारी सायंकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी अपलोड केली.

अशा प्रकारे अभिव्यक्ती स्वतंत्र्य दडपणे म्हणजे दिवसाढवळ्या लोकशाहीचा खुन आहे. मोदी-फडणवीस व त्यांच्या बगलबच्यांची अघोषित आनिबानीच आहे. कर्तव्यतक्ष पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन व पोलिस सह आयुक्त रानडे यांच्या आदेशाने ही आजची लोकशाही विरोधी कार्यवाही आमच्यावर झाली. मोदी फडणवीसांनी निवडणूकीत खोटे बोलून जनतेची मते घेतली, दिलेली आश्वासने पाळली नाही, म्हणून त्यांच्यावर पोलीस फसवणूक व विश्वासघाताचा गुन्हा दाखल करतील काय, असा प्रश्न उपस्थित करत अशा कितीही कारवाया झाल्या, तरी आम्ही घाबरणार नाही. लोकशाही वाचविण्यासाठी ९ तासच काय येरवडा जेलमध्ये ९ वर्ष राहण्याची आमची तयारी आहे, असेही भापकर यांनी आपल्या फेसबुकवरील पोस्टमध्ये नमूद केले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button