breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मुख्यमंत्र्याची खोटी आश्वासने? ; पिंपरी-चिंचवडकरांवर होणार गाजराचा पाऊस  

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा मुख्यमंत्र्यांवर उपरोधिक टीका 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – एकेकाळी देशात सर्वांत वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवड गणले होते. परंतू, सत्ताधारी भाजप काळात हे शहर राहण्यायोग्य शहरात पिछाडीवर पडले आहे. शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी वेळेवर देवू शकत नाही, कच-याचे जागोजागी ढिग पडले आहेत. अनधिकृत बांधकाम, शास्तीकर, संरक्षण हद्दीतील रस्त्याचा प्रश्न, रेडझोन यासह आदी प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. त्या प्रश्नाची सोडवणूक न करता केवळ भूलथापा देवून पिंपरी चिंचवडकरांना खोटी आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे उद्याही मुख्यमंत्र्याचा शहरवासियांवर गाजराचा पाऊस होईल, अशी उपरोधिक टिका महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे. 

साने यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,  पिंपरी चिंचवड शहराने मागील १५ वर्षात स्मार्ट सिटीकडे वेगाने वाटचाल करीत होते. नागरिकांना प्राधान्याने सोयी-सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.  राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीकोनातून शहराची विकासाकडे वाटचाल झाली.

परंतू,  राज्याचे मुख्यमंत्र्यांनी पिंपरी-चिंचवडकरांना भावनिक भूलथापा करीत अनेक खोटी आश्वासने दिली.  महापालिकेच्या निवडणुकीतही सत्ता द्या, शंभर दिवसात सगळे प्रश्न सोडविता, अशी आश्वासने दिली. आजही शहरातील प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. लोकांची घरे अद्याप अधिकृत झालेली नाहीत. शास्तीकर संपुर्ण माफ केलेला नाही. याशिवाय अन्य प्रश्नाकडे भाजप नेत्यांनी दुर्लक्ष केले आहे. पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीत समावेश करुन ते अद्याप कागदावर स्मार्ट सिटी प्रकल्प राबविला जात आहेत. प्रत्यक्षात स्मार्ट सिटीची कामे अजूनही झालेली नाहीत.

दरम्यान,  मागील निवडणुकीच्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी खोटं बोल पण रेटून बोलले, आता तेच मुख्यमंत्री पुन्हा पिंपरी चिंचवडकरांना मताचा जोगवा मागण्यासाठी शहरात येणार आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आले आहेत.  त्यांना पिंपरी चिंचवडकरांच्या प्रश्नाचे काहीच देणं-घेणं नाही. त्यांना आमचे जाहीर खुले आव्हान आहे. आमच्या शहरासाठी काय करणार ते सांगा, शहरातील पाणी, कचरा, स्वस्तात घरे, शिक्षण, सुरक्षितता, जेष्ठांच्या सुविधा, ना भय, ना भ्रष्टाचार मुक्त कारभार, गुन्हेगारी यावर तुम्हा बोला, शहराचे प्रश्न अद्याप का? प्रलंबित ठेवले, त्याचा खुलासा करुन आमच्या प्रश्नाची उत्तरे द्या, असे आवाहन केले आहे.

विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना विचारले खडे सवाल, आम्हाला जवाब दो आंदोलन 

१.      एक लाख लोकांचा शास्तीकर 100% माफ करणार का?

२.      एक लाख अनधिकृत घरे अधिकृत होणार का?

३.      छोट्या घरांची बांधकाम नियमावली सोपी करणार का?

४.      पंतप्रधान आवास योजना वाढीव दराने केल्या त्या तपासणार का?

५.      पंतप्रधान आवास योजनेत गरिबांना 5 लाखात घर देणार का?

६.      पिंपरी चिंचवड शहराला 24 x 7 पाणी देणार का?

७.      पवना बंद पाईप लाईन योजना करणार का?

 ८.      भामा आसखेड धरणासाठी नागरिकांचे पैसे माफ करणार का?

९.      स्मार्ट सिटीच्या पहिल्याच कामात रिंग करून L & T कंपनीला काम देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून दबाव आहे का?

१०. स्मार्ट सिटी म्हणजे निवडणुकांसाठी भाजपचे अकाऊंट आहे का?

११. PMO/CMO (आपले सरकार) वरील पिंपरी चिंचवडच्या तक्रारींची दखल घेतली का?

१२. मनपाचे कचऱ्याचा करारनामा करून 7 महिने झाले आता तरी कामाचे आदेश देणार का?

१३. BVG/AG Enviro कंपन्यांना काळ्या यादीत टाकणार का?

१४. कचऱ्यातून वीज महापालिकेला मोफत देणार का?

१५. शहरातून मेट्रो निगडीला, चाकणला व हिंजवडीला नेणार का?

१६. 425 कोटींच्या कामात भ्रष्टाचाराची चौकशी करणार का?

१७. महापालिका सल्लागारांना चालवायला देणार का?

१८. पिंपरी चिंचवडचा सुधारित डीपि करणार का?

१९. पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, भाजपचे प्रवक्ते व पगारी नोकर आहेत का?

२०. शहरातील महिला-मुलींवर अत्याचार, गुन्ह्यांचे वाढते प्रमाण याला वेसण घालणार का?

२१. मतं मागायची म्हणून स्वत: आले मुंबईत बसूनच online भाषण का केले नाही? कशाला पक्ष कार्यकर्त्यांची धावपळ केलीत?

२२. “ना भय ना भ्रष्टाचार”  या विचाराला पिंपरी चिंचवड शहरात तुमच्याच नेत्यांनी मूठमाती दिली हे तपासणार का?

२३. महाराष्ट्राचा पेट्रोल-डीझेल वरील कर कमी करणार का?

२४. 2017 च्या अगोदरची काही कामे बंद केली आहेत ती भाजपची घरची कामे आहेत का?

२५. हिंजवडीच्या आयटी पार्कच्या समस्या मिटणार का?

२६. पिंपरी चिंचवड शहरात कोणते नवीन उद्योग आणले?

२७. समृद्धी मार्ग जसा युध्द पातळीवर तशीच मदत दुष्काळग्रस्तांना करणार का? 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button