breaking-newsमुंबई

मुंबई पोलिस दलातून ‘हिना’ आणि ‘विकी’ सेवानिवृत्त

मुंबई पोलिसांना अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे हिना आणि विकी हे दोन श्वान निवृत्त झाले आहेत. वयाच्या दुसऱ्या महिन्यापासून मुंबई पोलीस दलात दाखल झालेले हे दोन्ही श्वान काल(बुधवारी) १० वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले.

बुधवारी तब्बल दहा वर्षाच्या सेवेनंतर या दोन्ही श्वानांना मुंबईचे पोलिस आयुक्त सुबोध जयस्वाल यांनी सन्मानाने निवृत्ती दिली. २४ जानेवारी २००८ रोजी जन्मलेली हिनाचा दोन महिन्यांची असताना मुंबई पोलिसांच्या श्वान पथकात समावेश झाला होता. गेल्या दहा वर्षात हीनाने अनेक गुन्ह्यांचा छडा लावला. तिने अपेक्षेपेक्षा चांगलीच कामगिरी बजावली म्हणूनच अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात देखील आलं आहे. काही वर्षापूर्वी भोईवाडा परिसरात फुटपाथवर झोपलेल्या एका तरूणाची डोक्यात दगड घालून हत्या असो, कुर्ल्यात लहान मुलीच्या हत्या आणि बलात्काराच्या घटना असोत किंवा खार परिसरातील जेष्ठ नागरिक दाम्पत्तची हत्या असो, हिनाने प्रत्येक वेळेस गुन्हेगाराला अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

तर, विकी हा श्वान देखील हीना पाठोपाठ पोलिस दलात दाखल झाला होता. २६ जून २००८ रोजी जन्मलेला विकी यानेही अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात मोलाची भूमिका बजावली. आझाद मैदान पोलिस क्लब येथे निवृत्तीच्या वेळी हिनाचे हँडलर्स उमेश चापटे, विकास शेंडगे आणि विकीचे हँडलर्स बाळासाहेब चव्हाण आणि दीपक देशमुख हेही उपस्थित होते.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Mumbai: ‘Heena’ and ‘Vicky’ – two dogs of Mumbai police Crime Dog Squad retired today after working for 10 years. Their trainers say “The senior officers have decided to keep them in the office. They will be there and we will look after them.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button