Views:
278
पुणे: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. टँकरमधून झालेल्या तेलगळतीमुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली असून महामार्गावर ४ ते ५ किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे विकेण्ड साजरा करण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांचा, गावाला चाललेल्या कुटुंबांचा खोळंबा झाला आहे.
रस्त्यावर तेल सांडल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून अमृतांजन पूल ते खंडाळा बोगद्यादरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तेल बाजूला करून रस्ता स्वच्छ करण्याचं काम वेगानं सुरू आहे. परंतु, वाहतूक पूर्वपदावर यायला आणखी काही तास लागतील, असं समजतं. त्यामुळे जुन्या मार्गाचा वापर करणं किंवा दुपारपर्यंत प्रवास टाळणं प्रवाशांसाठी इष्ट ठरणार आहे.
Like this:
Like Loading...