महाराष्ट्र

मुंबई इंडियन्सचा हैदराबादवर चार गडी राखून दणदणीत विजय

मुंबई: वानखडेवरील सामन्यात मुंबई इंडियन्सनं सनरायझर्स हैदराबादचा चार विकेट्सनी पराभव केला. नितीश राणा आणि कृणाल पंड्या यांनी पाचव्या विकेटसाठी केलेल्या 38 धावांच्या झटपट भागिदारीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं दणदणीत विजय मिळवला.

वानखेडे स्टेडियमवरच्या या सामन्यात हैदराबादनं मुंबईला विजयासाठी 159 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची 14व्या षटकात चार बाद 111 अशी स्थिती होती. त्या परिस्थितीत नितीश राणा आणि कृणाल पंड्या यांनी पाचव्या विकेटसाठी 21 चेंडूंत 38 धावांची भागीदारी रचून मुंबईला विजयपथावर नेलं.  कृणाल पंड्यानं 20 चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांसह 37 धावांची खेळी उभारली. नितीश राणानं 36 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांसह 45 धावांची खेळी केली.

तर प्रथम फलंदाजी करताना हैदराबादकडून वॉर्नरनं 49 धावा केल्या तर धवननं 48 धावा केल्या. मात्र, त्यानंतर एकाही फलंदाज चांगली कामगिरी करु शकला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button