breaking-newsमहाराष्ट्र
मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघातात १० जण ठार

नाशिक : चांदवड येथे मुंबई-आग्रा महामार्गावर सोग्रसजवळ आज पहाटे वाळूचा ट्रक आणि मिनी ट्रॅव्हल्स दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात १० जण ठार झाले असून १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील सर्वजण कल्याण, उल्हासनगर आणि नाशिक येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येतं आहे.
वाळूचा ट्रक आणि मिनी ट्रॅव्हल्समध्ये जोरदार धडक झाल्यानं हा अपघात झाला. या भीषण अपघातात ट्रॅव्हल्समधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जखमींचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. इतर जखमींवर चांदवडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व जण देवदर्शनासाठी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे गेले होते. देवदर्शनाहून परतत असताना काळानं त्यांच्यावर घाला घातला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.