breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मी राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत नाही -शरद पवार

सोलापूर – राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांच्या नावाच्या चर्चेला उधाण आले आहे. खुद्द शरद पवारांनीच या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. आज सोलापूरकरांतर्फे शरद पवार यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी त्यांनी मी राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत नसल्याचे स्पष्टपणे माध्यमांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार कोणती राजकीय खेळी करतात याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागलेले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपकडे पुरेसे संख्याबळ आहे. त्यामुळे मोदींनी विरोधकांशी चर्चा केल्यास राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होईल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
भाजपकडे राज्यसभेत आणि लोकसभेत पुरेसे संख्याबळ आहे. यामुळे केवळ मतांच्या जोरावर राष्ट्रपतीपदाचे स्वप्न पाहणे उचित नसल्याचेही पवार म्हणाले.