breaking-newsमहाराष्ट्र

मी राजीनामा दिलाच नाही – श्रीपाद छिंदम

अहमदनगर अहमदनगर मनपाचा भाजपाचा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदमच्या राजीनामानाट्याचा कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. छिंदमने मी राजीनामा दिलाच नसल्याचा दावा केला आहे. शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम यांनीच माझ्या लेटरहेडचा गैरवापर केला आणि राजकीय षडयंत्रातून माझ्या लेटरपॅडवर बनावट सहीने उपमहापौर पदाचा राजीनामा तयार करुन मंजूर केल्याचा आरोप छिंदमने केला. या प्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी छिंदमने केली.

भाजप खासदार दिलीप गांधी यांनीच छिंदमचा राजीनामा घेऊन पक्षातून हकालपट्टी केल्याचे जाहीर केले होते. मात्र छिंदमच्या या दाव्याने गांधी तोंडघशी पडले आहेत. या प्रकरणी खासदार गांधी यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

छिंदमनं उपमहापौर असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात अक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी राज्यभरात शिवप्रेमींनी रोष व्यक्त केला होता. या प्रकरणी भाजप खासदार दिलीप गांधी यांनी छिंदमची पक्षातून हकालपट्टी करुन उपमहापौर पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केला होता. त्याचबरोबर मनपाच्या महासभेत छिंदमचं नगरसेवक पद रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेकडे सादर केला होता.

या प्रकरणी नगरविकास विभागानं छिंदमला मे महिन्यात नोटीस बजावून दहा दिवसात म्हणणं मांडण्यास बजावलं  होतं. मात्र छिंदमनं जून महिन्यात नोटीसला उत्तर देऊन राजकीय षडयंत्राची फोडणी दिलीय. त्यामुळं जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघालंय.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button