breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिळकतकराच्या सवलत योजनेला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ द्यावी; नगरसेवक अमित गावडे यांची मागणी

 

पिंपरी – मिळकतकर एक रकमी भरण्याची सवलत योजना 20 एप्रिलपासून सुरु झाली. परंतु, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मे महिना संपत आला तरी मिळकतधारकांना देण्यात येणा-या बीलांची अद्यापही छपाई झालेली नाही. त्यामुळे या योजनेला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी नगरसेवक अमित गावडे यांनी केली आहे.

 

यासंदर्भात गावडे यांनी सह आयुक्त दिलीप गावडे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रशासनाने सवलत योजना सुरु करण्याअगोदरच बीलांची छपाई करुन मिळकतधारांकाना देणे आवश्यक होते. तसे न झाल्यामुळे मिळकतधारक सवलतींपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यामुळे पालिकेच्या तिजोरीत देखील पैसे जमा होत नाहीत. दफ्तर दिरंगाईबाबत विचारणा केली असता भांडार विभाग हा करसंकलन विभागाकडे बोट दाखवतो. या दोन विभागाच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य नागरिक सवलतीपासून वंचित राहता कामा नये, याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

 

ही योजना 30 जूनपर्यंतच आहे. आता मे महिना संपत आला आहे. तरी बिलांची छपाई अद्याप झालेली नाही. बिलांची छपाई होण्यासाठी जून महिन्याचा पहिला आठवडा उलटणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ केवळ 20 दिवसच नागरिकांना मिळण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे मिळकतधारक सवलतींपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यामुळे पालिकेच्या तिजोरीत देखील पैसे जमा होणार नाहीत. ही योजना 30 जूनपर्यंतच आहे. आता मे महिना संपत आला आहे. त्यामुळे कर सवलत योजनेला एक महिना म्हणजे 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. मुदवाढ दिल्यास करदात्यांना दिलासा मिळले. ते एकरकमी कराचा भरणा करतील. परिणामी, पालिकेच्या तिजोरीत देखील पैसे जमा होतील.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button