breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मावळ व शिरूर लोकसभेसाठी महापालिका पदाधिका-यांनी बजाविला मतदानाचा हक्क

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाची निवडणुक चौथ्या टप्यात होत आहे. आज सोमवारी (दि. २९) पिंपरी-चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात सकाळी सात वाजता उत्साहात मतदानाला सुरूवात झाली. सकाळीच अनेक मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसत होती. मात्र, दुपारनंतर उन्हाचा पारा वाढल्याने आता बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी ओसरली आहे. दोन्ही मतदारसंघातील राजकीय नेतेमंडळीनी आपआपले मतदान करुन राष्ट्रीय कर्तव्य बजावले आहे.  

मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड आणि पिंपरी या दोन विधानसभा मतदारसंघांचा, तर शिरूर लोकसभा मतदारसंघात भोसरी या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. मावळ लोकसभा मतदारसंघात २२ लाख ९७ हजार ४०५ मतदार असून, शिरूर लोकसभा मतदारसंघात २१ लाख ७३ हजार ४२४ मतदार आहेत.

या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा यासाठी निवडणूक आयोगाने मावळ लोकसभा मतदारसंघात २ हजार ५०४ मतदान केंद्र तयार केले आहेत. या मतदान केंद्रांवर मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येईल. या सर्व मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजता उत्साहात मतदानाला सुरूवात झाली. यंदा उन्हाचा पारा जास्त वाढला आहे. त्यामुळे मतदारांनी सकाळी मतदान करण्यासाठी पसंती दिल्याने बहुतांश मतदान केंद्रांवर सकाळी गर्दी पाहायला मिळाली.

शिरुर लोकसभा मतदारसंघात चिखली येथील जिल्हा परिषद शाळेत महापाैर राहूल जाधव आणि पत्नी मंगलताई जाधव यांनी मतदानाचा हक्क बजाविला.

महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांनी सहपत्नीक मतदान केले.

 

महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, त्याच्या सुविद्य पत्नी आणि मुलगी सहपरिवार मतदान केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button