‘मावळ इनवेस्टमेंट हब’ निर्माण करुन तरुणाच्या हाताला रोजगार देवू – पार्थ पवार

- बारामती, पिंपरी-चिंचवडमध्ये होवू शकतेय, मग मावळात का ? नाही
- महिलांसाठी स्वतंत्र इंडस्ट्रीज, लहान मुलांचे हाॅस्पीटल प्रश्न प्राधान्याने सोडवू
पिंपरी ( महा ई न्यूज ) – मावळ लोकसभा मतदारसंघात बेरोजगारांचा प्रश्न गंभीर बनला आहे. 25 वर्षाच्या 50 टक्के तरुणाचा हाताला काम मिळत नसल्याने लाखो तरुण शिक्षण घेवून घरी बसले आहेत. त्यामुळे ‘मावळ इनवेस्टमेंट हब’ निर्माण करुन तरुणाच्या हाताला रोजगार देवू – अशा विश्वास महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी दिला.
पनवेलमधील सुकापूर गावात आयोजित सभेत राष्ट्रवादी, काॅंग्रेस, शेकाप महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार हे बोलत होते. यावेळी आमदार बाळाराम पाटील, काशिनाथ पाटील, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, जय म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
पार्थ पवार म्हणाले की, बेरोजगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण ‘मावळ इनवेस्टमेंट हब’ निर्माण करुन देशासह परदेशातील कंपन्यांना एकत्रित करणार आहोत. यामध्ये स्थानिकांची मदत घेवून त्यांना जागा व अन्य सुविधा देणार आहोत. काहींनी मला हे अशक्य आहे असल्याचे सांगितले. परंतू, मी त्यांना बोललो की, जे बारामतीत, पिंपरी-चिंचवडमध्ये होवू शकते, ते का मावळात होवू शकणार नाही, असं त्यांना मी सांगितले. जेणे करुन किमान 50 वर्षे येथील लोकांचे जीवन सुखी-समाधानी होण्यास निश्चित मदत होणार आहे.
तसेच मावळातही कोणत्या भागात ज्या महिला काम करु शकतील, त्या भागात महिलांसाठी स्वतंत्र इंडस्ट्रीज उभारणार आहे. महिलांना देखील काम देवून त्यांना रोजगाराची संधी देणार आहोत. याशिवाय लहान डे केअर सेंटर, लहान मुलांचे हाॅस्पीटल, नर्सिंग होम उभारण्याचा माझे नियोजन आहे. तसेच केंद्रातून कर्जत ते सीएसटी असे रेल्वे सुरु करण्याचा माझा मानस आहे. याशिवाय उर्वरीत भागात अधिक रेल्वे ट्रॅक करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.
आदिवाशी भागातील युवकांनाही काम देण्याचा प्रयत्न असणार आहे. अनेक युवकांकडे काैशल्य नसल्याने त्यांना काम मिळत नाही. त्यामुळे त्या युवकांना काैशल्य आधारित ट्रेनिंग दिल्यास त्या-त्या युवकांना काम मिळण्यास मदत होणार आहे. असेही पार्थ पवार यांनी यावेळी सांगितले.