मावळात धनुष्यबाणाचाच विजय निश्चित, खासदार श्रीरंग बारणे यांचा विश्वास

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघात पुन्हा एकदा धनुष्यबाणाचा विजय निश्चित होणार आहे. हे मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावून दाखवून दिले आहे, असा विश्वास महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. मावळ लोकसभेसाठी उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना बारणे यांनी लोकांनी त्यांच्यावर ठेवलेला विश्वास व्यक्त केला.
बारणे म्हणाले की, लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. तो विश्वास आज मतदानातून व्यक्त होताना दिसत आहे. त्यामुळे मावळात पुन्हा एकदा धनुष्यबाणाचा विजय निश्चित आहे. मावळ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला अबाधित राहणारच आहे. जो उमेदवार माझा प्रतिस्पर्धक आहे. त्यांना मतदानाचा अधिकार देखील नाही. हे लोकांना माहीत आहे. त्यांनी मोदी सरकारच्या माध्यमातून केलेला विकास पाहिला आहे. राष्ट्रवादीची अवस्था राज्यात बिकट झाली आहे. त्यांनी झोपडपट्टी भागाला टार्गेट केले आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी प्रामाणिक मतदार विकासाला मतदान करणार, याची मला खात्री आहे, असेही बारणे यांनी म्हटले आहे.