breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
माथेरानच्या दरीत कोसळून एका महिलेचा मृत्यू

रायगड : माथेरान येथील 800 फूट खोल दरीत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली. गीता मिश्रा असं मृत महिलेचं नाव आहे. संगीता मुंबईहून पती आणि दोन मुलांसोबत माथेरान येथे फिरण्यासाठी आली होती.
संगीता मिश्रा या आपल्या पतीसोबत माथेरान येथे फिरण्यासाठी आल्या होत्या. यावेळी हे कुटुंब माथेरान येथील बेल्व्हीडीयर पॉईंट येथे गेले. या पॉईंटजवळ गेले असताना लहान दगडाला ठेच लागली आणि गीता यांचा तोल जाऊन त्या दरीत कोसळल्या. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर स्थानिक पोलीस आणि माथेरानमधील सह्याद्री बचाव पथकाने खोल दरीत उतरुन तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतहेद बाहेर काढला. या घटनेमुळे माथेरानमधील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.