माथाडी कामगारांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस आणणार – पार्थ पवार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – राष्ट्रवादीचे रणझुंजार उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारदौ-याला आज कळंबोलीत नियोजनबध्द सुरूवात झाली. सकाळी आकरा वाजता त्यांनी येथील मुंबई महानगर लोखंड व पोलाद बाजार समितीला भेट दिली. तेथील कामगारांशी प्रत्यक्ष संवाद साण्यात आला. गेल्या पाच वर्षामध्ये कामगारांची रोजीरोटी संकटात आल्याची व्यथा कामगारांनी पार्थ पवार यांच्याकडे मांडली. त्यावर कामगारांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस आणण्याचा विश्वास पार्थ यांनी यावेळी दिला.
मुंबई महानगर लोखंड व पोलाद बाजार समितीच्या माथाडी कामगार युनियनच्या वतीने पार्थ पवार यांचा सत्कार करण्यात आला. जवळपास तीन तास पार्थ पवार यांनी विविध कंपन्यांना भेट देऊन तेथील कामगारांचे प्रश्न जाणून घेतले. यावेळी बाजार समितीचे सभापती गुलाबराव जगताप, कोकण विभागाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील, पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माथाडी कामगार संघटनेचे नेते बाळा मराठे, विजय खाणावकर, रवी भगत, सुनिल घरत, नगरसेवक गोपाळ भगत, संपतराव गोडसे, राष्ट्रवादीचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, सातारा युवक अध्यक्ष तेजस शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
माथाडी कामगारांची दुसरी पिढी एमआयडीसीत काम करत आहे. शरद पवार यांनी आपल्याला चेंबुर, वडाळा, चिंचोली, नेरूळ येथे खोल्या दिल्या. 280 कोटी कर बोर्डाला भरावे लागणार होते. तो कर शरद पवार यांच्या प्रयत्नांमुळे माफ झाला. गुलाबराव जगताप आणि शषिकांत शिंदे दिल्लीला जाऊन पवार साहेबांनी यशवंत सिन्हा यांच्याशी संवाद साधल्यानंतर हा कर माफ झाला. त्यामुळेच तर माथाडी कामगारांना सुगिचे दिवस आले. अन्यथा आपल्यावर ते एक संकटच होते. गेल्या पाच वर्षात कामगारांचे बेहाल झाले असून केलेल्या कामाचे समाधान देखील मिळथ नसल्याची भावना व्यक्त झाली. कामगारांना समाधान आणि केलेल्या कष्टाचे चीज करून देण्यासाठी पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे, अशी भावना देखील माथाडीच्या पदाधिका-यांनी यावेळी व्यक्त केली.