breaking-newsताज्या घडामोडीपुणे

माजी सैनिकांच्या घराला 100 टक्के कर सवलत द्या

पिंपरी- महापालिकेच्या हद्दीत राहणा-या प्रत्येक माजी सैनिकांच्या घराला 100 टक्के कर सवलत मिळावी, अशी मागणी माजी सैनिक ज्येष्ठ नागरिक जन आंनदोलन कृती समितीचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेन्शन घेणा-याच माजी सैनिकांना ही सवलत मिळत असून, काही कारणाने नोकरी पूर्ण न करु शकलेल्या माजी सैनिकांना ही सवलत मिळत नाही. 2010 साली आम्ही सर्व माजी सैनिकांनी मागणी केली असता, त्यावेळी महापालिकेने फेरप्रस्ताव मंजूर केला होता. परंतु, ही सवलत पेन्शन घेणा-या सैनिकांनाच देण्याचा निर्णय घेतला होता. यापुढे महापालिकेच्या हद्दीत राहणा-या प्रत्येक माजी सैनिकांच्या घराला 100 टक्के कर सवलत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button