breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

माजी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्या मुलाचे निधन

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार बंडारू दत्तात्रेय यांचा २१ वर्षीय मुलगा वैष्णवचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. एमबीबीएसच्या तृतीय वर्षांत शिकत असलेल्या बंडारू वैष्णवने छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्याला सिकंदराबाद येथील गुरूनानक रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान बुधवारी उशिरा त्याचे निधन झाले. बंडारू दत्तात्रेय तेलंगणातील सिकंदराबादचे भाजपा खासदार आहेत. ते मोदी सरकारमध्ये वर्ष २०१४ ते १ सप्टेंबर २०१७ पर्यंत श्रम आणि रोजगार मंत्री होते. दक्षिण भारतातल्या राजकारणात बंडारू दत्तात्रेय यांची वेगळी ओळख आहे. बंडारू दत्तात्रेय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button