breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
मागील दहा वर्षापासून मावळ विकासापासून कोसो दूर – पार्थ पवार

– कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात पार्थ पवार यांचा झंझावाती प्रचार दौरा
– फटाक्यांच्या आतषबाजीत पार्थ पवारांचे स्वागत
कर्जत – मागील दहा वर्षांपासून शिवसेना खासदारांनी मावळात कोणत्याही प्रकारची विकास कामे केलेली नाहीत. त्यामुळेच मावळ मतदारसंघ हा विविध विकास कामापासून दुर्लक्षित झालेला आहे. मात्र, मावळात महाआघाडीच्या हाती सत्ता दिल्यावर मावळ लोकसभा मतदारसंघ ‘देशात आदर्श मतदारसंघ’ असेल अशी ग्वाही महाआघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांनी नागरिकांशी संवाद साधताना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस, शेकाप, आरपीआय(कवाडे गट) आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात झंझावाती प्रचार दौरा केला. यावेळी त्यांनी कर्जत-खालापूर मधील प्रमुख कार्यकर्त्यांच्या तसेच नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. प्रचार दौ-याला खालापूर तालुक्यातील कैरे गावापासून आजच्या दौराला सुरूवात झाली. ठिकठिकाणी पार्थ पवार यांचे औक्षण करून तसेच फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले. आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी पार्थ पवार यांना विजयी करण्याचा दृढ संकल्प केला.
प्रचारादरम्यान पार्थ पवार यांनी खालापूर तालुक्यातील जेष्ठ नागरिक, तरुण-तरुणी, सामान्य नागरिक, महिला यांची भेट घेऊन चर्चा केली. मावळ लोकसभा मतदारसंघ देशात अव्वल बनविणार असल्याची ग्वाही देखील यावेळी पार्थ पावर यांनी दिली.
तसेच कर्जत-खालापूर तालुक्यात अनेक समस्या, अडीअडचणी, त्रुटी राहिलेल्या आहेत. विद्यमान खासदारांनी अनेक प्रश्न आणि कामे प्रलंबित ठेवली आहेत. मात्र, हीच विकासकामे आणि प्रश्न निवडून आल्यावर निकाली काढण्याचे आश्वासन पार्थ पवार यांनी नागरिकांना दिले आहे.
यावेळी कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार सुरेशभाऊ लाड,राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे,रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश पाटील,आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.