मुंबई – केंद्र सरकारच्या कृषी धोरणाच्या विरोधात पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न समजून न घेतल्याने हा उद्रेक झाला आहे. ‘मागील एक वर्षात महाराष्ट्र राज्यातील बळीराजा कधी रस्त्यावर आला नाही हे या सरकारचे यश आहे’, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई येथे ‘महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही’ या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षापूर्तीनिमित्त या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली.
अवश्य वाचाः केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील शेतकर्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र कॉंग्रेसचा जाहीर पाठिंबा
कधी नव्हे ती मिळालेली सत्ता हातातून गेल्यामुळे काही लोक सतत शंका उपस्थित करण्याची भूमिका घेत आहेत, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे. हे सरकार पाच वर्ष जनतेसाठी काम करत राहील, असा विश्वास असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कृषी कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलन करत आहे. हजारो शेतकरी ट्रॅक्टर, रेशन असा सर्व लवाजमा घेऊन दिल्लीकडे कूच करत आहेत. यात लहानांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत सर्व वयोगटाचा समावेश आहे. कृषी कायद्याच्या विरोधात असलेले हे आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे.
अवश्य वाचाः पदवीधर मतदार संघ निवडणूक : चंद्रकांत पाटलांच्या संकूचित वृत्तीमुळे भाजपाचा पराभव!