महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला मारहान, आकुर्डीत तणाव

पिंपरी – मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीने रस्त्याच्या बाजूला उभारलेल्या महिलेचा विनयभंग केल्याने नागरिकांत संताप उसळला. हा प्रकार बघून नागरिकांनी युवकाला चांगला चोप दिला.
हा प्रकार आज गुरुवारी (दि. 24) सकाळी दहाच्या सुमारास आकुर्डी येथे घडला. सागर भीमराव प्रमाणे (वय 42, रा. चिंचवड) असे मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय महिला आकुर्डी येथे रस्त्याच्या बाजूला थांबली होती. मागच्या बाजूने सागर आला आणि त्याने महिलेला मिठी मारली. या प्रकारामुळे महिला घाबरली. हा अनुचित प्रकार बघून आसपासच्या नागरिकांनी सागरला चांगला चोप दिला. प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी सागरला पोलिसांच्या ताब्यात दिले. महिला खाजगी रुग्णालयात तर सागर खाजगी कंपनीत काम करतात. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.