Views:
162
लोणावळा, (वार्ताहर) – माहिती अधिकार कायद्यानुसार दोनपेक्षा अधिक वेळा माहिती मागवणाऱ्या नागरिकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा प्रकारचे पत्र काढणाऱ्या महा-वितरण कंपनीचा तसेच कंपनी अधिकाऱ्यांचा लोणावळा शहरात निषेध करण्यात आला.
मावळ तालुका वीज वितरण समिती सदस्य सुनील तावरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत लोणावळा महा-वितरण कार्यालयात जाऊन निषेध निवेदन अधिकाऱ्यांना दिले. फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील पत्र वीज वितरण कंपनी कडून मागे घेण्यात आले असले, तरीही हे पत्र म्हणजे भारतीय लोकशाहीने नागरिकांना दिलेल्या अधिकारावर एक प्रकारे घाला असल्याचे सांगत भविष्यात पुन्हा अशी चूक केली जाऊ नये, असा इशारा सुनील तावरे यांनी महा-वितरण कंपनी अधिकाऱ्यांना दिला.
Like this:
Like Loading...