breaking-newsराष्ट्रिय

महाराष्ट्राच्या मनिषा वाघमारेने केले एव्हरेस्ट सर

औरंगाबाद : मराठवाड्याची आंतरराष्ट्रीय महिला गिर्यारोहक मनीषा वाघमारे हिने जगातील सर्वोच्च उंचीवर असणारे शिखर माऊंट एव्हरेस्टवर आज सकाळी ८ वाजून १० मिनिटाला यशस्वी चढाई केली. यासोबतच ही मोहीम फत्ते करणारी ती मराठवाड्याची पहिली महिला गिर्यारोहक ठरली.

या वर्षी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या मनीषाने 17 मे रोजी रात्री एक वाजता बेस कॅम्पवरून एव्हरेस्ट शिखरावर कॅम्प 1 कडे कूच केली होती. रविवारी (२० मे ) एव्हरेस्टच्या कॅम्प ४ वर पोहोचली. हवामान अनुकूल असल्याने ती रविवारीच जगातील सर्वोच्च उंचीवर ( ८ हजार ८४० मीटर ) असणारे एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करण्यासाठी निघाली. आज सकाळी ८ वाजून १० मिनिटाला तिने हे शिखर सर करत एव्हरेस्ट मोहीम फत्ते केली. अशी माहिती आयसीएफचे कमांडर विनोद नरवडे यांनी दिली. या यशस्वी चढाईनंतर ती माघारी फिरली असून तिचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे.

गतवर्षी निसर्गाने रौद्ररूप धारण केल्यामुळे इंडियन कॅडेट फोर्सची कॅडेट असलेली मनीषा एव्हरेस्ट सर करण्यापासून अवघ्या १७० मीटरपासून वंचित राहिली होती; परंतु या वर्षी नव्या उमेदीने व जिद्दीने ती ४ एप्रिल रोजी एव्हरेस्ट मोहिमेसाठी रवाना झाली होती. त्याच दिवशी ती काठमांडू येथे पोहोचली होती. त्यानंतर तेथील हवामानाशी जुळवून घेण्यासाठी तिने ४५ दिवसांच्या कालावधीत कालापथ्थर, पमोरी हाय कॅम्प तसेच २८ एप्रिल ते १ मेदरम्यान तिने बेस कॅम्प ते कॅम्प १, कॅम्प २ आणि कॅम्प ३ असे रोटेशन्स केले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button