breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

महापालिकेतील 289 कर्मचा-याच्या नोकरीवर टांगती तलवार

आयुक्तांना अहवाल सादर ः त्या कर्मचा-यावरील कारवाई लक्ष

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील वर्ग 3 व 4 मधील कर्मचा-यांनी राखीव प्रवर्गातून नोकरी मिळविली. परंतू, सेवेत दाखल होवूनही त्यांनी प्रशासनाकडे अद्याप जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. त्या कर्मचा-याचा वस्तुस्थिती अहवाल महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पाठविला आहे. त्यामुळे तब्बल 289 कर्मचा-यांच्या नोकरीवर टांगती तलवार निर्माण झाली आहे.

महापालिकेत राखीव प्रवर्गातून 323 अधिकारी व कर्मचारी सेवेत दाखल झाले आहेत. त्या कर्मचा-यांनी सेवेत दाखल झाल्यानंतर सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र पालिका प्रशासनाकडे सादर करणे, हे बंधनकारक आहे. परंतू, नोकरी लागल्यानंतरही कित्येक वर्षे लोटली तरीही त्या कर्मचा-यानी पालिका प्रशासनाकडे जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही.  राज्य शासनाच्या अनुसूचित जाती-जमाती समितीच्या सदस्यांचा दौरा पिंपरी-चिंचवड महापालिकेत झाला, तेव्हा झालेल्या बैठकीत या वैधता प्रमाणपत्रांचा विषय ऐरणीवर आला होता. महापालिकेत वर्ग एक ते चारचे एकूण साडेसात हजार अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. यामधील ३२३ जणांनी जात पडताळणी केलेली नाही. त्यातील १४५ जणांनी संबंधित समितीकडे अर्ज केलेले आहेत. मात्र, १४४ जणांनी अर्जच केलेले नाहीत. यामध्ये बहुतांशी कर्मचारी वर्ग चारचे आहेत. तसेच, काही अधिकारीही आहेत.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गंभीर दखल घेतली. ज्यांनी वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही, त्यांनी ते तातडीने सादर करावे, असे आदेश त्यांनी दिले. यासाठी २७ एप्रिलपर्यंतची मुदत त्यांनी दिली. या मुदतीत जेमतेम २५ जणांनी प्रमाणपत्र सादर केले आहेत. मात्र, इतरांकडून कसलाही प्रतिसाद दिलेला नाही. १४४ जणांनी अद्यापही काहीच केलेले नाही. त्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही आणि ते मिळावे, यासाठी त्यांनी अर्जही केलेले नाहीत. त्याच्यावर नोकरीवरून काढून टाकण्याची कारवाई आयुक्त हर्डीकर करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button