breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेतील आणखी शंभराहून अधिक कर्मचा-यांची लवकरच उचलबांगडी

पिंपरी – महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रजेवर जाण्यापूर्वी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या सुमारे सव्वा दोनशे अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यातील काही अधिका-यांनी अद्याप पदभार स्विकारलेला नाही. दरम्यान, महापालिकेत आणखी शंभराहून अधिक अधिकारी-कर्मचा-यांच्या बदल्यांचे प्रस्ताव तयार असून आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या सहीनंतर सोमवारी (दि.4) करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने बदल्या संदर्भात एक धोरण ठरवून घेतले होते. त्यानुसार दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात तीन वर्षात टेबल व सहा वर्षात विभागाअंतर्गंत बदली करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, राजकीय पदाधिकारी, नगरसेवकांचा दबावामुळे प्रशासन या बदल्यांच्या धोरणाला हरताळ फासत होते. त्यावर अनेक वेळा आरोप झाले. त्यामुळे यंदा बदल्यांबाबत ठोस भूमिका घेतल्याचे समजले आहे. आयुक्त हर्डीकर 11 मे ते 2 जून दरम्यान रजेवर गेले होते. ते रजेवर जाण्यापूर्वी त्यांनी सुमारे सव्वा दोनशे अधिकारी-कर्मचा-यांच्या बदल्यांच्या आदेशावर सह्या केल्या होत्या.

यामध्ये स्थापत्य, बांधकाम परवाना, नगररचना, पाणीपुरवठा, ड्रेनेज अशा ‘मलईदार’ विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अभियंत्यांचाही समावेश होता. तसेच स्थापत्य बीआरटीएस, ड्रेनेज विभागातील कार्यकारी अभियंता, बांधकाम परवाना विभागातील कार्यकारी अभियंत्यांचा समावेश होता. तसेच सुमारे 223 जणांचा त्यात समावेश होता.
दरम्यान, महापालिकेत सुमारे साडेसात हजार कर्मचारी, अधिकारी करित आहेत. यापैकी अनेकजण वर्षानुवर्षे एकाच जागी अथवा विभागात कामकाज करतात. सोमवारी आयुक्त श्रावण हर्डीकर हे सुट्टीवरुन परत येणार आहेत. ते आल्यानंतर स्थापत्य विभागातील कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, आरोग्य निरीक्षक, वैद्यकीय विभाग, आरोग्य विभागातील जवळपास शंभराहून अधिक कर्मचा-या बदल्या करण्यात येणार आहेत. अशी माहिती सुत्रांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button